वैभववाडी /-
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी विजय जिवाजी कदम रा. करुळ भट्टीवाडी यांच्या मालकीचा पाडा ठार झाला आहे. यात कदम यांचे वीस हजार चे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. विजय कदम यांचा मुलगा सकाळी गुरे घेऊन जंगलात गेला होता. दबा धरून बसलेल्या बिबट्याने गुराच्या कळपातील पाड्यावर हल्ला चढविला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या शेतकऱ्याला संबंधित विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.