अर्णव गोस्वामींच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता ?सूत्रांची माहीती

अर्णव गोस्वामींच्या पत्नीला अटक होण्याची शक्यता ?सूत्रांची माहीती

कोल्हापूर /-

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता अर्णव गोस्वामी यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. आज मुंबई पोलिसांकडून अर्णव गोस्वामींच्या पत्नीला कधीही अटक होऊ शकते, अशी खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

रायगड पोलीस काल अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळी अर्णव गोस्वामी यांच्यासह त्यांच्या पत्नीने रायगड पोलिसांच्या कारवाईला विरोध करून त्यांना धक्काबुक्की केली होती.

त्याविरोधात रायगड पोलिसांच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानावडे यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावरूनच त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..