सासोली येथे रास्ता रोको आंदोलन करत भाजपने केला शासनाचा निषेध !

सासोली येथे रास्ता रोको आंदोलन करत भाजपने केला शासनाचा निषेध !

पालकमंत्री, आमदार, खासदारांसह बांधकाम विभागाला येतच नाही जाग

अन्यथा खासदार नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली उपोषण : राजेंद्र म्हापसेकर

दोडामार्ग /-

दोडामार्ग तालुक्यातील रस्त्याच्या दुरावस्थेवरून आज भाजपाने सासोली येथे रास्ता रोको केला जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारवर निशाणा साधताना “उद्धवा अजब तुझे सरकार” असे म्हणत सरकार सह बांधकाम विभागाचा निषेध करण्यात आला. सध्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांचा यावेळी निषेध करताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्यांचा प्रश्न जटील बनल्याचे यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले तर सार्वजनिक बांधकाम विभागाला जर ठेका दिलेला ठेकेदार तुम्हाला ऐकत नसेल त्यांच्याकडून ठेका काढून घ्या, त्याच्यावर कारवाई करा अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. शिवसेना, राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेसचे हे सरकार तिगाडी सरकार पांढऱ्या पायाचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

फडणवीस सरकारने झाराप पत्रादेवी रस्त्यासाठी 110 कोटी रुपये दिले त्यांचे या सरकारने नियोजन केले नाही त्यामुळे हा रस्ता असल्याचे यावेळी म्हापसेकर यांनी सांगितले, “अंदर की बात है, सब हमारे साथ है” असे म्हणत या रस्त्यामुळे जनता कर्मचारी-अधिकारी हे सर्व आंदोलने करा म्हणतात यासाठी हे आंदोलन केल्याचे म्हापसेकर व नाडकर्णी यांनी स्पष्ट केले. तर यावेळी आंदोलन माहीत असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली त्यामुळे जनतेला न्याय मिळत नाही म्हणून सार्वजनिक बांधकाम उपअभियंता विजय चव्हाण यांना आंदोलनकर्त्यांनी धारेवर झाले अखेर विजय चव्हाण यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत रस्ते सुस्थितीत करतो असे पत्र देताच बांदा पोलीस निरीक्षक श्री जाधव दोडामार्ग प्रभारी पोलिस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या विनंतीला मान देत सहकार्य म्हणून आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी 30 नोव्हेंबर पर्यंत रस्ते सुस्थितीत न झाल्यास खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली उग्र आंदोलन छेडू असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.

अभिप्राय द्या..