सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

सौ.शितल गोसावी यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर.;

चौके/अमोल गोसावी

आविष्कार फाऊंडेशन इंडिया ( कोल्हापूर – महाराष्ट्र ) या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा परुळे- कुशेवाडा च्या सहाय्यक शिक्षिका सौ. शितल झिलु गोसावी यांना जाहीर करण्यात आला आहे.आविष्कार फाऊंडेशन ही संस्था सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय, सांस्कृतिक क्षेत्रात गेली १४ वर्षे कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी शाळा बंद असल्या तरी शिक्षक मात्र काम करत आहेत हे आदर्शवत आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका सौ. शितल गोसावी यांनी केलेल्या आणि करत असलेल्या उल्लेखनीय कार्याची विशेष नोंद घेऊन आविष्कार संस्थेच्या वतीने सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षिका पुरस्कार जाहीर करण्यात आला.दरम्यान सौ. शितल गोसावी यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..