मालवण/

शासकीय नोंद वहिच्या उतारयात आचरा गावातील आठ महसूली गावात मिळून ३८३एकर जमिन शासकिय जमीन असल्याचे निदर्शनास येत आहे.मात्र सद्यस्थितीत सदर जमिनी खाजगी मालमत्ता धारकांच्या कब्जात असल्याने शासनाच्या विविध योजनांसाठी त्या वापरात येऊ शकत नसल्याने गावविकासासाठी अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे सदर जमीनीची पुर्नलेखनाखाली सुनावणी करुन सातबारा उतारी शासकीय जमीन म्हणून पुर्ववत करण्याची मागणी आचरा ग्रामपंचायत मार्फत निवेदनाद्वारे मालवण तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली आहे.याबबतचे निवेदन आचरा सरपंच प्रणया टेमकर यांनी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्द केले.यावेळी त्यांच्या सोबत उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश टेमकर आदी उपस्थित होते.
आचरा गावात शासकीय जमीनी असूनही खाजगी मालमत्ता धारकांच्या ताब्यात असल्याने त्यांचा गावविकासासाठी वापर केला जाऊ शकत नसल्याने आचरा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या बाबत चर्चा करून त्या बाबतचा ठराव करत तहसीलदार मालवण यांना निवेदन देण्याचे ठरविण्यात आले होते. या नुसार मंगळवारी मालवण येथे तहसीलदार यांना आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात पिरावाडी मधील सर्वे नंबर १२ही जमीन समुद्र किनारपट्टी व पुळण क्षेत्र आहे.परंतू या जमीनीच्या क्षेत्रात खाजगी व्यक्तींनी कुळवहीवाट दावा क्रमांक२८/२०१९तहसिलदार मालवण यांच्या न्यायालयात दाखल करुन दिनांक ३-४-१९रोजी कुळ सदरी नाव चढविणे बाबत आदेश केला आहे. परंतू सदर जमीन शासकीय नोंदी नुसार शासकीय दिसत आहे. काही जमीनी खाडी पात्राखाली येत असून या क्षेत्रात सुद्धा काही व्यक्तींच्या नावाच्या नोंदी आहेत. तर काही शासकीय जमीनींवर कुळ सदरी काही फेरफार करून नोंदी केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या निवेदनाची तातडीने दखल घेत सातबारा उतारी जमीन पुर्ववत शासकीय करण्याची मागणी आचरा ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page