नाटकासाठी आवश्यक साहित्यातून साकारला १० फुटी नटराज

मसुरे /-

सावंतवाडी येथील बॅ.नाथ पै सभागृहामध्ये ५ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या रंगभुमी दिनानिमित्त श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कलादिग्दर्शक सुमित पाटील यांनी संदेशपर अश्या एका अनोख्या चित्रफितीचे चित्रीकरण नुकतेच केले. सावंतवाडी नगराध्यक्ष श्री. सच्चीदानंद (संजू)परब यांनी उदघाटन केले.
रंगभूमी दिनानिमित्त १० फुटाचा भव्य आगळा वेगळा नटराजाचे इंस्टोलेशन करण्यात आले.यात लेखन,नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा आदी नाटकासाठी गरजेच्या असणाऱ्या साधनापासून हा नटराज साकारला होता.

मराठी रंगभूमीचे हे १०० वे वर्ष आहे.अनेक कलाकारांसाठी रंगभूमी हा प्राणवायू आहे.पण या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे रंगभूमीची सेवा खंडित झाली आहे.त्यासाठी ह्या कलाकारांनी एक वेगळ्या प्रकारे श्रीगणेशा केला आहे.या उपक्रमाने सर्व रंगकर्मीना एक दिलासा आणि आशेचा किरण दिसेल , हे नक्की.
सदर चित्रफितीचे दिग्दर्शन हे सुमित पाटील आणि किशोर नाईक हे करत असून, लेखन वेद दळवी यांनी केले आहे.छायाचित्रण साक्षी खाडये आणि संकेत जाधव यांनी केले.विशेष म्हणजे यात सिंधुदुर्गातील कलाकारांनी भाग घेतला आहे.त्यात मंगल राणे ,विठ्ठल तळवलकर,निलेश गुरव संकेत कुडाळकर आदी कलाकारांनी अभिनय केला आहे.

गेले ७ ते ८ महिने नाट्यगृह बंद आहेत.त्यामुळे नाटकाशी निगडित सर्व तंत्रज्ञ, कलाकार हे व्यक्तिगत आयुष्यात इतर कामे करून जगत आहे.त्यामुळे लवकरच सर्व नाट्यगृह सुरू व्हावीत.व रंगकर्मीना दिलासा मिळावा असे आवाहन यात करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page