आचरा /-

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे.या बाबत आचरा पोलीस स्टेशनतर्फे त्यांना शनिवारी निरोप देण्यात आला.

गेले वर्षभर आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळताना कळेकर यांनी सर्व घटकांना सांभाळून घेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम केले होते.लोकांमध्ये मिळून मिसळून वावरणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती.वडीलांच्या त्रासामुळे घर सोडून जाणारया मुलाला आईचं छत्र मिळवून देण्यासाठी तसेच कुडाळ पिंगुळी येथील त्या तान्हुल्याला मदतीचा हात असो सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सहह्दयतेने कायद्याच्या पलिकडे जाऊन काम केले होते. कोरोना महामारीत लाॅकडाउन काळात या भागातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कडक उपाययोजनेवर विशेष भर दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page