जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या अदलीबदलीने होणाऱ्या पक्षांतराचा चाललायं बिनपैशांचा “तमाशा”.प्रसाद गावडे मनसे

जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या अदलीबदलीने होणाऱ्या पक्षांतराचा चाललायं बिनपैशांचा “तमाशा”.प्रसाद गावडे मनसे

“अलटी पलटी- सुमडीत कलटी” च्या घटनांवर मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची घणाघाती टीका

निवडून देणाऱ्या सर्वसामान्यांच्या पदरात काय पडलं याचा विचार आता जनतेनेच करावा..!

कुडाळ /-

मागील काही कालावाधीपासून जिल्हयात पक्षांतराचा पेव फुटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.अगदी काल परवा कुडाळ पंचायत समिती मधील लोकनियुक्त सदस्यांनी शिवसेना भाजप पक्षातून अदलीबदलीने पक्षांतर करून आपापल्या पक्षाना घरचा आहेर दिला.तद्नंतर एकमेकांवर टीका टिप्पणी, दावे प्रतिदावे यासारख्या घटना घडत असताना या सगळ्यात सर्वसामान्य जनता व त्यांचे मूलभूत प्रश्न कुठे आहेत याचा विचार आता जनतेनेच करण्याची काळाची गरज बनली आहे. ज्या आस्थेने व अपेक्षांनी जनता निवडून देते त्यांना पायदळी तुडवुन वैयक्तिक आकांशांच्या आहारी जाऊन जनतेचा असा भ्रमनिराश करणे कितपत योग्य आहे, याचा जाब ह्यांना आता जनतेनेच विचारण गरजेचं आहे. अगदी झोपताना कूस बदलावी तसे वारंवार पक्ष बदल केले जात असताना पक्षाची ध्येय धोरणे,आचार विचार व वैचारिक नीतिमत्ता कुठे हरवली आहे याचा गांभीर्याने विचार आता जनतेनेच करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्यासाठी खस्ता खाललेल्या व आपल्यावर विश्वास ठेवून बहुमूल्य मतदान करून निवडून देणाऱ्या जनतेलाच गृहीत धरून धोका देत समाजकारण विसरून राजकारणाच्या दलदलीत एकडुुन तिकडे उड्या मारणाऱ्या या नतभ्रष्ट लोकांना जनतेने नाकारून कायमचा धडा शिकवावा व महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा ध्यास घेवून निष्ठापूर्वक समाजसेवेचा वसा जोपासणाऱ्या मा.राजसाहेब ठाकरेंच्या महाराष्ट्र सैनिकांना आजमावून एकदा संधी द्यावी असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी व्यक्त केले आहे.

अभिप्राय द्या..