वेंगुर्ला /-

भाजपा संघटन पर्व २०२० अंतर्गत बुथरचना करण्याबाबत आसोली पंचायत समिती मतदार संघात सागरतिर्थ – टाक येथे बुथप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , शक्ती केंद्र प्रमुख विजय बागकर आदी उपस्थित होते .यावेळी बुथरचनेचा आढावा घेतला व नवीन बुथरचना करताना सर्वांना सामावून घेऊन सर्व समावेशक बुथकमिटी स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या बैठकीस ६५ – मोचेमाड बुथप्रमुख उदय गावडे , ६६ – अणसुर चे वामन गावडे, ६७ – न्हैचीआड चे – संकेत धुरी, ७४ – आसोली चे – सचिन गावडे, ७५ – आसोली चे – गुरुनाथ घाडी, ७६ – आरवली चे – निलेश प्रभु, ७७ – आरवली चे – देवेंद्र वस्त तसेच सागरतिर्थ ग्रा.पं. सदस्य राजु गोडकर , वैभव धुरी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page