कणकवली पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांना राष्ट्रवादीचा दणका तडकाफडकी बदलीचे आदेश..

कणकवली पोलीस निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांना राष्ट्रवादीचा दणका तडकाफडकी बदलीचे आदेश..

राष्ट्रवादीचे अमित सामंत यांनी घेतली गंभीर दखल..

यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍यांनी दिलेला ञास सहन केला जाणार नाही,अमित सामंत

कुडाळ /-

कणकवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री.शिवाजी कोळी यांची तडकाफडकी बदली.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलेला ञास भोवला.कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्या विरोधात कणकवली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक श्री.राजेंद्र दाभाडे व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या जवळ केलेल्या तक्रारी नुसार जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी आज मुंबई येथे गृहमंत्री नाम.अनिल देशमुख यांची भेट घेऊन कोळी विरोधातील तक्रारीची कैफियत मांडली. आणि कोळींच्या बदलीची मागणी केली. त्यानुसार गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार आजच कोळींच्या बदलीचे संकेत दिले. त्यानुसार त्यांना सागरी सुरक्षा दल इथे हलविण्यात आले.जिल्ह्यात यापुढे कुठल्याही प्रशासकीय अधिकार्‍यांने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ञास देण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेतला जाणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा.अमित सामंत यांनी देऊन जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी सदैव राहणार . असल्याचे सामंत यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..