श्री जोतिबा मालिकेतील माहिती पट चुकीचा दाखवून भावना दुखवल्याबद्दल व खोटी माहिती प्रसारित करून फसवून केल्याबद्दल कोठारे प्रोडक्शन वर कारवाई करा अशी गुरव समाज्याच्या वतीने सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन दिले .उपसरपं श्री शिवाजीराव सांगळे(दादा) यांनी या मालिकेची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे देऊन गुन्हेनोंद करन्याची मागणी केली असून खोटा इतिहास खपवून घेतला जाणार नाही असे सांगितले ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे यांनी मालिकेतील चुकीची माहिती दाखवली तर ती खपवून घेनार नाही व असे पुढे असे झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही असा इशारा दिला , सामाजिक कार्यकर्ते आनंदा लादे यांनी जोतिबा देवाचा इतिहास हा केदार विजय ग्रंथानुसार नसून यामुळे विटंबना झाली आहे असे सांगितले ग्रा पं.सदस्य श्री लखन लादे यांनी महेश कोठारे यांनी दिशाभूल करन्याचा प्रयत्न केलाचे सांगितले.या निवेदनासाठी व मागणीसाठी युवा नेते गुरव समाज जिल्हा सरचिटनिस ओंकार सांगळे यांनी प्रमुख भूमिका बजावली यावेळी श्रीपूजक, ग्रामस्थ युवा वर्ग , उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page