सावंतवाडी /-
कोरोना या महामारी रोगाची सुरुवात झाल्यापासून गेले सात महिने चिकाटीने व सचोटीने जिल्हाभर कोरोना प्रतिबंधक लढा देणारे सावंतवाडी येथील उदोजक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.संजु विरनोडकर या कोरोना योध्याला व त्यांचे सहकारी.हे खरे धाडसी कोरोना योध्दे! यांचा नवरात्र ऊस्तव माठेवाडा व नागरीक समिती यांच्या वतीने सत्कार करणयात आला.
संजू विरनोडकर व त्यांच्या टीमने , कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करत ,आपला जीव दुसऱ्यान साठी जे काम केले ते खरोखरच वख|डण्याजोग आहे.असे सत्कार करते वेळी ,माठेवाडा नवरात्र ऊस्तव मंडळाच्या सदस्यांनी उद्गगार काढले.
तसेच नवदुर्गा च्या काळात, नवरात्र ऊस्तवात सावंतवाडी शहरातील सर्व नवरात्रऊस्तव मंडप व लगतच्या परिसरात नऊही दिवस रोज सकाळी सहा वाजल्या पासुन बेंझाक्यूलम सोलुशन या नाॅन ब्लिच सोलुशन ने केव्हीड प्रतिबंधक मोफत फवारणी करत होते. त्याच वेळी ग्रामिण क्षेत्रात पण कार्य करत होते. मंडळाच्या वतीने विरनोडकर टिमचे संजु विरनोडकर व आकाश मराठे यांचा गौरव करताना माठेवाड्यातील जेष्ठ नागरिक श्री.दिगंबर माटेकर.यावेळी आत्मेश्वर मंदिरात माठेवाडा नवरात्र ऊस्तव समिती आणि नागरीक मोठ्या संखेने उपस्थित होते.