कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी दिवसभरात मिळालेल्या अहवाला नुसार ०३ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एकही रूग्ण आढळून आला नाही. तर ग्रामीण भागात ३ रुग्ण आढळले.
कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कटगांव १, गुढीपूर १, हुमरमळा १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४६१ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४३९ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या २२ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११४० तर बरे झालेले रुग्ण १००५ आणि सक्रिय रुग्ण ९८ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.