कुडाळ /-
कुडाळ शहर महिला भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने नवदुर्गाचा महिलाचा सत्कार करण्यात आला.कुडाळ शहर महिला भाजपच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम केले जातात,त्यात यावर्षी कोरोनाचा काळात चांगले काम करणाऱ्या,व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा कुडाळ शहर महिला भारतीय जनता पक्ष|च्या वतीने सत्कार करण्याचा कार्यक्रम कुडाळ भाजप कार्यालयात करण्यात आला.
यावेळी यावेळी भाजपच्या महिला शहर अध्यक्ष| सौ.ममता धुरी, नगरसेविका सौ.साक्षी सावंत ,जिल्हा कार्यकारिणी सदस्या सौ. अस्मिता बांदेकर ,माजी जि. प.अध्यक्ष| सौ.दीप्ती पडते ,सौ रेखा काणेकर ,
भाजपच्या कुडाळ महिला अध्यक्ष सौं आरती पार्टील , जिल्हा चिटणीस सौ.आरोनदेकर , नगरसेविका, सौ अश्विनी गावडे, नगरसेविका सौ. उषा आठले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य| सौ.अदिती सावत ,रचना नेरुरकर ग्रामपंचायत सदस्य नेरूर च्या रचना नेरुरकर अन्य महिला उपस्थित होत्या. विविध क्षेत्रातील नवदुर्गा महिला उपस्थित होत्या.