नवी दिल्ली /-
▪️माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षाच्या कारावासची शिक्षा सुनावली आहे.
▪️दिलीप राय यांच्यासह अन्य दोन व्यक्तींना शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत पराशर यांनी निर्णय दिला.
▪️अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री असताना दिलीप राय यांनी 1999 साली झारखंडमधील कोळसा खाणीचे परवाने देताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
▪️ राय यांच्यासह कोळसा मंत्रालयातील तत्कालिन वरिष्ठ अधिकारी प्रदीपकुमार बॅनर्जीे आणि नित्यानंद गौतम तसेच कॅस्ट्रॉन टेक्नॉलॉजिसचे संचालक महेंद्रकुमार आगरवाल हे या प्रकरणात आरोपी आहेत.
▪️न्यायालयाने सीटीएल 60 लाख रुपये तर सीएमएलला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोळसा घोटाळा प्रकरणात अशा कलमांखाली दोषी ठरलेले राय हे पहिलेच माजी केंद्रीय मंत्री आहेत.