नवी दिल्ली /-

▪️भारताचे माजी सॉलीसिटर व सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ वकील हरीश साळवे वयाच्या ६५ व्या वर्षी दुसऱ्यावेळी बोहल्यावर चढत आहेत.

▪️या आठवड्यात हा विवाह ब्रिटन येथे साजरा होत आहे. साळवे याना जानेवारी २०२० मध्ये क्वीन्स कौन्सिल केले गेले आहे. साळवे यांनी पहिल्या पत्नी मीनाक्षी याना नुकताच घटस्फोट दिला आहे.

▪️२८ ऑक्टोबर रोजी ते एका चर्चमध्ये विवाह करणार असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असल्याचेही सांगितले जात आहे.

▪️हरीश साळवे त्यांची ५६ वर्षीय मैत्रीण कॅरोलिना हिच्यासोबत विवाहबद्ध होत आहेत. कॅरोलिना कलाकार असून या दोघांची पहिली भेट एका आर्ट गॅलरी मध्ये झाली होती.

▪️त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली आणि आता त्याचे पर्यवसान विवाहात होत आहे. साळवे मुळचे नागपूरचे आहेत.

▪️ देशाचे सरन्यायाधीश बोबडे आणि हरीश साळवे नागपूर मध्ये एकाच शाळेत शिकले आहेत. देशातील अनेक चर्चित प्रकरणात साळवे यांनी नामवंत लोकांची बाजू मांडली आहे.

▪️ मुकेश अंबानी, रतन टाटा, आयटीसी हॉटेल, वोडाफोन, बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या केसेस त्यांनी लढविल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page