शिवसेनेत संजय राऊतांचा दबदबा वाढल्याची जोरदार चर्चा..

शिवसेनेत संजय राऊतांचा दबदबा वाढल्याची जोरदार चर्चा..

ठाकरेंच्या आधी फक्त राऊत यांचेच भाषण..

मुंबई /-

▪️शिवसेनेच्या काल झालेल्या दसरा मेळाव्यातून पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण करून संपूर्ण देशाचं आपल्याकडे लक्ष वेधून घेतले असले तरी या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांआधी फक्त शिवसेना नेते संजय राऊत यांचं एकट्याचंच भाषण झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

▪️याआधी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ज्येष्ठ नेत्यांचीही भाषणं होत असतात. उध्दव ठाकरे व्यासपीठावर येण्याआधी आणि आल्यानंतरही ज्येष्ठ नेते आपली मनोगते व्यक्त करतात.

▪️ मात्रं यंदा ही परंपरा मोडीत काढण्यात आली. विशेष म्हणजे व्यासपीठावर अन्य ज्येष्ठ नेतेही असताना फक्त राऊतांचंच भाषण झाल्याने शिवसेनेत राऊतांचा दबदबा वाढला काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

▪️राज्यात सत्तांतर होत असताना केवळ संजय राऊतच शिवसेनेची भूमिका मांडत होते. तर कालच्या भाषणात त्यांनी ठाकरे यांच्या आधीच यापुढे शिवसेना हि कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत लढेल असे जाहीर केले. या प्रकारामुळे संजय राऊत हेच शिवसेनेचे सर्वेसर्वा असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे इतर ज्येष्ठ नेत्यांमधे मात्र नाराजी असल्याचेही बोलले जात आहे.

अभिप्राय द्या..