राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती..

मालवण / –

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दशमीलानागपूर येथे लाखो लोकांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तो दिवस देशभरात धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून बौद्ध बांधव मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांचे आयोजन करून साजरा करतात त्याचाच भाग म्हणून काल भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्यावतीने खोटले येथे तालुक्यातील कुटुंबीयांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव उपस्थित होते .
खोटले व ओवळीये येथील सदस्याना राष्ट्रीय सचिव प्रभाकर जाधव , जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आर. डी चेंदवणकर , जिल्हा संस्कार सचिव सुनिल जाधव तसेच तालुका शाखा मालवण अध्यक्ष सिद्धार्य जाधव , संस्कार उपाध्यक्ष गौतम पळसबकर , संजय पेंडूरकर व तालुका कार्यकरणी सदस्य ,गाव शाखा खोटले अध्यक्ष शंकर खोटलेकर व कार्यकारणी , फूले शाहु आंबेडकर विचारमंच आयु किशोर चव्हाण , महीला सदस्या यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्स राखुन बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली

नाम फलकांचे उदघाटन…

भारतीय बौद्ध महासभा मालवण तालुका शाखेच्या वतीने अध्यक्ष सिद्धार्थ जाधव सचिव सूर्यकांत कदम उपाध्यक्ष रविकांत कदम यांच्या उपस्थितीत चौके, धामापूर व काळसे या गाव शाखांच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page