भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला…
वेंगुर्ला /-
भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा – वेंगुर्ले च्या वतीने “जागर नवरात्रीचा …… सन्मान नारीशक्तीचा” या कार्यक्रमाअंतर्गत ९ रणरागिणींचा भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो.वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्यां ९ रणरागिणींच्या कार्याचा – त्यांच्या कर्तुत्वाचा जागर करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा – वेंगुर्लेच्या वतीने आज सकाळी भाजपा तालुका कार्यालयात “नवदुर्गा पुरस्कार सोहळा” आयोजित करण्यात आला होता.यावेळी भाजपाचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,महिला तालुका अध्यक्षा तथा माजी पं. स. उपसभापती दामले, जिल्हा चिटनीस ऍड. सुषमा खानोलकर, महिला जिल्हा सरचिटणीस सारीका काळसेकर,शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , वेंगुर्ले न.प.नगरसेविका साक्षी पेडणेकर,सुजाता देसाई , वृंदा गवंडळकर,समृद्धी धानजी, रीमा मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते
वेंगुर्ले तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळात समाजासाठी अविरत काम करणाऱ्या व वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात प्रशंसनीय कामगिरी करुन आपल्या नावाची छाप सोडणाऱ्या रणरागिणींचा सन्मान आयोजित करण्यात आला होता.यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील तालुका आरोग्य अधीकारी डाॅ. अश्विनी माईणकर – सामंत , प्रशासकीय अधिकारी वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी उमा शिवाजीराव पाटील ,वेंगुर्ला पोलिस उपनिरीक्षक रुपाली गोरड, संगीत क्षेत्रातील संगीत विशारद अनघा गोगटे,उद्योग क्षेत्रातील नर्मदा कॅश्यु इंडस्ट्रीजच्या प्रोप्रायटर व यशस्वी उद्योजिका मंदाकीनी दिलीप सामंत , क्रीडा क्षेत्रातील मैदानी क्रीडा मार्गदर्शक व ऍथलीट संजीवनी चव्हाण, साहित्यिक क्षेत्रातील जेष्ठ साहित्यिक व कवी वृंदा कांबळी , कोरोनाच्या लढ्यात इन्सीडंट कमांडर म्हणून महत्त्वाची भुमिका बजावणारया वेंगुर्ले नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल , कोरोना काळात सर्व्हेक्षण , ट्रेस ट्रॅकींग व ट्रीटमेंट असे अत्यंत जोखमीचं काम करणारया ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्यसेविका विनीता तांडेल अशा ९ रणरागिणींचा “नवदुर्गा पुरस्कार” देवून गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला हसीना बेन मकानदार, यशश्री नाईक, भाग्यलक्ष्मी घारे,आकांक्षा परब, सावरी शेलटे , अस्मिता रगजी,कृतिका साटेलकर,रेवती राणे इत्यादी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या.