कुडाळ /-

राष्ट्रवादीने मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला पक्षाला धक्का दिला आहे.काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.आज कुडाळ येथील सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काका काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधलं.त्यानंतर आज काका कुडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.2019 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण मतदार संघात काँग्रेसकडून काका कुडाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी निवडणूकीतून माघार घेतली होती.मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. कोकणात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी जोरदार प्रयत्न करणार असल्याचं कुडाळकर यांनी सांगितलं. वर्षभर काँग्रेसमध्ये नाराज असलेले कुडाळकर आज अखेर राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री.अमिता सामंत ,माजी राज्यमंत्री श्री.प्रवीण भोसले,जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस ,जिल्हा उपाध्यक्ष श्री.सुनील भोगटे ,उदयोग व्यापार जिल्हाध्यक्ष पुंडलिक दळवी,नगरसेवक अबीत नाईक,युवक जिल्हाध्यक्ष श्री.प्रफुल्ल सुद्रीक,सावळाराम अणवकर,कुडाळ तालुका अध्यक्ष श्री.भास्कर परब,बाळ कण्|यालकर,शिवाजी घोगळे, अशोक कांदे,आत्माराम ओठवणेकर,संग्राम सावंत अन्य पदाधिकारी प्रवेश करते वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page