कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ३ रुग्ण आढळून आले तर पणदूरमधील आश्रमात मात्र २ रुग्ण आढळला.
कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ ३, पणदूर २, बिबवणे १, गढीपूर १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४५२ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४१७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ३५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११०३ तर बरे झालेले रुग्ण ९७२ आणि सक्रिय रुग्ण ९६ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३५ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.