आंबडपाल ग्रा.प.सदस्य गोट्या चव्हाण यांचा राकेश कांदेना टोला..
कुडाळ /-
कुडाळ बस्थानकाचे काम आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहे. ईनिविदे द्वारे हे काम राकेश कांदे यांच्याच पक्षातील त्यांचे हितसंबंध असलेले सहकारी ठेकेदार विजय प्रभू याना मिळालेले आहे. त्यामुळे बस्थानकाला गळती का ? हा प्रश्न राकेश कांदे यांनी निवडणुकीमध्ये सोबत फिरणाऱ्या विजय प्रभू याना विचारावा. असा टोला आंबडपाल ग्रा. प. सदस्य धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण यांनी आज भाजप कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे यांना लगावला आहे. याबाबत आमदार महोदयांनी अनेकवेळा तक्रार करूनही अशाच प्रकारचे काम प्रभू करत आहेत. आता हे काम शेवटच्या टप्प्यात असून येत्या काहीच दिवसात हे काम पूर्ण करून घेतले जाईल. व येत्या १०-१५ दिवसांमध्ये या कामाचे उदघाटन करण्यात येणार आहे.अशी माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली आहे.