आनंदव्हाळ घाटीतील वळणावर रस्ता खड्डेमय झाल्याने अपघाताची शक्यता…

मालवण / –

मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटीत वळणावर रस्त्याच्या एका बाजूने खड्डेमय भाग झाल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे खड्डेमय भाग चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता आहे . याची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी घेतील का ?? असा सवाल वाहनचालकांकडून केला जात आहे.
मार्च, 2020 पूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते त्याच वेळी आनंदव्हाळ घाटीतील वळणावर रस्त्यावर खड्डा पडला होता. त्यानंतर लॉकडाउनच्या कालावधीत याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष न दिला गेल्यामुळे पावसामध्ये रस्त्याचे डांबर ,खडी वाहून जाऊन वळणावर रस्ता एका बाजूने खड्डेमय झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना विशेषता दुचाकीस्वारांना, रिक्षा चालकांना वाहने चालविणे त्रासाचे झालेले आहे.
कुणकावळे बागवाडी येथील रस्त्यात वळणावर सुद्धा अशाच प्रकारचे खड्डे पडले असून बारीक खडी रस्त्यावर पसरल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.
गुरामवाडी येथील रस्त्यावर खड्डे पडलेले आहे.
कट्टा पोलीस चौकी नजीकच्या ब्रिज वर रस्त्याची अक्षरशा चाळण झालेली आहे
सावरवड गणेश मंदिरापासून एका बाजूने डांबरीकरण केलेले असून दुसरी बाजू खड्डेमय झालेली आहे.
तरी या रस्त्याच्या दुरावस्थेची सार्वजनिक बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी दखल घ्यावी अशी मागणी रिक्षाचालक व दुचाकीस्वारांनी केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page