आरोग्य सभापतीपदी अनंत धडाम व महीला व बालकल्याण उपसभापती संध्या तेरसे यांचीही करण्यात बिनविरोध निवड…

कुडाळ /-

कुडाळ नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापतीपदी उषा आठल्ये.;तर बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे बिनविरोध,तर आरोग्य सभापतीपदी अनंत धडाम व महीला व बालकल्याण उपसभापती संध्या तेरसे यांचीही करण्यात बिनविरोध निवड..तर विरोधी गटाच्या शिवसेनेच्यावतीने कोणीही अर्ज दाखल केला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

कुडाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध केली असल्याची चर्चा शहरात सुरू होती,कुडाळ नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापतीपदी उषा आठल्ये, बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे तर आरोग्य सभापतीपदी अनंत धडाम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाची निवड.आज सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत पार पडली.

सत्ताधारी भाजपच्या वतीने बालकल्याण व सभापती पदासाठी उषा आठल्ये, बांधकाम सभापती पदासाठी अश्विनी गावडे व आरोग्य सभापती पदासाठी अनंत धडाम यांनी व बालकल्याण उपसभापती पदासाठी संध्या तेरसे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी वंदना खरमाळे यांच्याकडे अर्ज दाखल केला.

तर विरोधी गटाच्या शिवसेनेच्यावतीने मात्र कोणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी कुडाळ नगरपंचायत येथे कार्यालयात महीला व बालकल्याण उपसभापती पदासाठी संध्या तेरसे, महीला व बालकल्याण सभापती उषा आठल्ये, आरोग्य शिक्षण व स्वच्छता सभापतीपदी अनंत धडाम व बांधकाम व पर्यटन सभापतीपदी अश्विनी गावडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी मुख्याधिकारी नितीन गाढवे, नगराध्यक्ष ओंकार तेली, सत्ताधारी पक्षाचे उमेदवार व नगरसेवक उपस्थित होते.

नुतन सभापती झालेल्या आठल्ये, गावडे, धडाम व तेरसे यांचे अभिनंदन नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर,भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी तालुकाध्यक्ष चारूदत्त देसाई, बंड्या सावंत, राजेश पडते, नगरसेवक सुनील बांदेकर, राकेश कांदे, नगरसेविका सरोज जाधव, साक्षी सावंत तसेच अविनाश पाटील, विजय कांबळी, राजु बक्षी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page