सिंधुदुर्गनगरी /-
राज्याचे सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील हे शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार दिनांक 24 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 1.00 ते 2.00 कुडाळ येथे आगमन व राखीव, दुपारी 2.00 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे पत्रकार परिषद, दुपारी 4.30 वा. महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. सोईनुसार कुडाळ येथून कराड, जि. साताराकडे प्रयाण.