वैभववाडी /-

एसटी आणि ईनोव्हा कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले आहेत. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील एसटी कणकवलीहुन लातूरकडे जात होती. हा अपघात कोल्हापूर – गगनबावडा मार्गावर कळे येथे घडला आहे. कोल्हापूर विक्रमनगर मधील माळवे कुटुंब ईनोव्हा कारने कळे येथे नातेवाईकांच्या घरी अंत्यसंस्कारासाठी जात होते. ईनोव्हा व एसटी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात माळवे कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले. तर उपचारासाठी नेताना एकाचा मृत्यू झाला आहे. कळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page