मसुरे/-
प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादन केलेल्या दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दिली जाणारी उत्तम पवार स्मृती ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती यावर्षी कु. गौरव सुहास जाधव (इ. १० वी) असरोंडी- मालवण तसेच कु. मानसी मंगेश कदम (इ. १२वी) उंबर्डे – वैभववाडी या दोन विद्यार्थ्यांना ज्ञानव्रती विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेचे प्रमुख कार्यवाह आनंद तांबे यांनी दिली.
दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मागील तीन वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या या शिष्यवृत्तीसाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रस्ताव अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जाते, शिष्यवृत्ती निवड समितीच्या विचारविनिमयातून आलेल्या प्रस्तावांमधून दहावी आणि बारावीच्या प्रत्येकी एक अशा दोन विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दरमहा शैक्षणिक प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती रक्कम आणि दर्पण गौरवपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. निवड समिती प्रमुख किशोर कदम, संतोष तांबे, नेहा कदम, विशाल हडकर आणि दिलीप कदम यांनी काम पाहिले.
संस्थाध्यक्ष राजेश कदम यांनी निवड झालेल्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले, आपल्या मनोगतात ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी मेहनत, चिकाटी आणि जिद्द बाळगून ज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक वृद्धिंगत कराव्यात, प्रतिकूल परिस्थितीत सोसलेल्या डंखांचे भान ठेवून यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्तीचे पंख लेऊन झेप घेण्याचे स्वप्न बाळगावे,आणि मिळवलेल्या ज्ञानाचा सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून स्वतःबरोबरच समाजविकासाच्या कार्यात सदुपयोग करावा
यावेळी दर्पण विशेष गुणवत्तापात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
◆ *दर्पण विशेष गुणवत्ता सन्मान*
*इ. १०वी साठी*-
गौरी दिपक कदम,(लोरे नं. २,वैभववाडी ),
रितेश राजेश कदम (नरडवे, कणकवली),
साक्षी विकास जाधव (चौकुळ, सावंतवाडी),
प्रणाली यशवंत कदम (हडी, मालवण)
*इ. १२वी साठी* –
साहिल संजय कदम (तिवरे, कणकवली),
प्रिया प्रभाकर कदम (जांभवडे, कुडाळ),
मयुर महेंद्र कदम (जांभवडे, कुडाळ),
सुप्रिया प्रकाश तांबे (शिरवंडे, मालवण)
या विद्यार्थ्यांनाही दर्पण सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी, सल्लागार, आणि सदस्यांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.दर्पण प्रबोधिनीच्या या शैक्षणिक उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.