मसुरे /-
पळसंब वरचीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व रामेश्र्वर विद्यामंदिर आचरा पिरावाडीचे लिपिक भगवान बाबु वरक ( ४५ वर्ष ) यांचे घराशेजारी शेतात काम करत असतानाच गुरुवारी सायंकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्याना शेती कामाची आवड असल्याने मागील काहि वर्षात विविध भाज्या, फळबाग यांची यशस्वी लागवड केली होती. पळसंब सारख्या छोट्या गावाचे नाव शेतीत अग्रेसर करण्याचा त्याचा मानस होता. उध्या शुक्रवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.