मुंबई /-
पोलीसांचे पगार आता एचडीएफसी बँकेत होणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2015 साली ऑक्सिस बँकेत मुंबई पोलिसांचे पगार करण्याबाबत करार करण्यात आला होता. या कराराची मुदत 31 जुलै 2020 रोजी संपली आहे. त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने एचडीएफसी बँकेसोबत करार केला असून या बँकेतूनच आता पोलिसांचे पगार होणार आहेत.
एचडीएफसीने दिलेल्या प्रस्तावात पोलीसांना अधिक सुविधा मिळत असल्याने या बँकेची निवड करण्याचा निणऱय घेण्यात आलाय. एचडीएफसी बँक पोलिसांनी 10 लाख रुपयांचं विमा कवच तर अपघाती मृत्यू आल्यास 1 कोटींपर्यंत विमा कवच, अपघातात विकलांग झाल्यास 50 लाख विमा कवच, अपघाती मृत्यूनंतर दोन अपत्यांना 10 लाख शिक्षणासाठी, रुग्णालयात उपचारांसाठी भरती झाल्यास 30 दिवसांपर्यंत प्रति दिन 1 हजार रुपये मदत अशा सुविधा एचडीएफसी बँक देणार आहे.