वैभववाडी /-
नावळे येथील जंगलमय भागात अज्ञात व्यक्तीने लावलेल्या फास्कित अडकून एक शेळी मृत्यू झाली आहे.तर दोन शेळ्या गायब झाल्या आहेत.शेतकऱ्यांचे सुमारे 22 हजार रुपयेचे नुकसान झाले आहे. रविंद्र राजाराम गुरखे रा.नावळे धनगरवाडा असे त्याचे नाव आहे. ही घटना बुधवार 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी घडली.
नावळे धनगर वाडा येथील शेतकरी रवींद्र गुरखे हे शेळ्या चालण्यासाठी बुधवार दुपारी नावळे गावातील जंगलमय भागात आपल्या शेळ्या घेऊन गेले होते. दरम्यान एक शेळी फास्कित अडकून मृत्यू झाली.तर अन्य त्यांच्या मालकीच्या दोन शेळ्या गायब झालेल्या आहेत.मृत झालेल्या शेळीची माहिती नावळे गावातील मठकर या व्यक्तीने शेळी मालक गुरखे यांना सांगितली.त्यानंतर शेळ्या मालकाने जंगलात अन्य दोन शेळ्या चा शोधाशोध सुरू केला.मात्र त्या अद्याप सापडलेल्या नाहीत.
नावळे येथील जंगलमय भागात अज्ञात व्यक्तीने रानटी डुक्कर मारण्यासाठी फासकी लावली होती.मात्र त्या फासकीत डुक्कर ऐवजी शेळी अडकून मृत्यू झाला . गरीब शेतकऱ्याचे सुमारे बावीस हजार रुपये इतके नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये फासकी लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा नोंद करून कडक कारवाई व्हावी या साठी फिर्याद दिली आहे.या घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करत आहेत. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये केलेली नाही.