कुडाळ /-
कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी मिळालेल्या अहवालानुसार दिवसभरात एकूण 30 कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात एक रुग्ण आढळून आला. तर पणदूरमधील आश्रमात २७ रूग्ण आढळले आहेत.कुडाळ तालुक्यात आज गुरूवारी ३० कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये कुडाळ १, पणदूर २७, ओरोस १, कालेली १ असे रूग्ण आढळून आले असून तालुक्यात ४४७ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४०७ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ४० कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण १०८५ तर बरे झालेले रुग्ण ९५४ आणि सक्रिय रुग्ण १०० आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३१ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.