वेंगुर्ला /-

नवरात्रोत्सव हा आदिशक्तीचा जागर करण्यासाठी केला जातो.वेंगुर्ले तालुक्यातील आपापल्या क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणारया ९ रणरागिणींच्या कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी भाजपा महिला मोर्चा – वेंगुर्लेच्या वतीने शनिवार २४ रोजी सकाळी ११ वाजता तालुका कार्यालयात नवदुर्गा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे .

वेंगुर्ले तालुक्यामध्ये कोरोना महामारीच्या काळातही समाजासाठी अविरत काम करणारया व वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात प्रशंसनीय अशी कामगिरी करुन आपल्या नावाची छाप सोडणाऱ्या व हीच छाप वेंगुर्लेची खास ओळख बनविणाऱ्या रणरागीणींचा सन्मान करण्यात येणार आहे.यावेळी वैद्यकीय, सामाजिक,उद्योग,क्रीडा , संगीत,साहित्यिक, शासकीय सेवेत,आरोग्य इत्यादी क्षेत्रात,प्रशासनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ९ महिला प्रतिनिधींचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तालुक्यातील महिला लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महिला तालुका अध्यक्षा – माजी उपसभापती स्मिता दामले, महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page