रक्तदान शिबीर आयोजीत करुन नवदुर्गा युवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली..

रक्तदान शिबीर आयोजीत करुन नवदुर्गा युवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली..

वैभववाडी/-

कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात आहे.अशा वेळी सामाजिक,स्वयंसेवी संस्था आपआपल्यापरीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील ‘नवदुर्गा युवा मंडळ’ विविध सामाजिक उपक्रम राबवुन व रक्तदान शिबीर आयोजीत करुन नवदुर्गा युवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.रक्तदान श्रेष्ठदान समजुन नवदुर्गा युवा मंडळाने आयोजीत केलेला रक्तदान शिबीर कार्यक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पालव यांनी केले.
जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली येथील रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते
‘नवदुर्गा युवा मंडळ’ गेली १८ वर्ष सातत्यपुर्ण सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करुन विविध धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक,उपक्रम राबवत आहे,तर गेली १० वर्ष रक्तदान शिबीर राबवित आहे. मनोज रावराणे म्हणाले,रक्तदान शिबिर राबहुन तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी पं. स.सदस्य मनोज रावराणे, दिपाली माळगावकर, हेमांगी रणदिवे- किशोर नांदगावकर,नितीन गावकर,उल्हास राणे,सुरेश डोंगरे धुमाळे,शिक्षिका रेणुका जोशी , ‘नवदुर्गा युवा मंडळा’ चे खजिनदार प्रदिप आगे,सल्लागार अरुणोदय पिळणकर,मंगेश मडवी,अमित दळवी,सचिन साळसकर कुर्ली ग्रामपंचायत सदस्य सुरज तावडे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते सचिव धीरज हुंबे,रवींद्र नवाळे,प्रदिप कामतेकर,प्रकाश दळवी,कृष्णा परब,निलेश पवार, तसेच फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी धुमाळे, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी शाखा फोंडाघाटचे कनिष्ठ अभियंता मोनाली बादलवाड,कर्मचारी विजय आग्रे उपस्थित हेते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता पंचम गृप फोंडाघाटचे राजेश शिरोडकर यांचे विशेष सहकार्य लाभले. मान्यवारांचे स्वागत धीरज हुंबे यांनी तर आभार श्री. रवींद्र नवाळे यांनी केले.

अभिप्राय द्या..