कुडाळ /-
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त ऑनलाइन घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये उच्च माध्यमिक गटात कुमारी स्वराली संदीप साळसकर मुक्काम पोस्ट वालावल हिने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. इतर सर्व नंबर हे रत्नागिरी, मुंबई ,धुळे ,गोंदिया जिल्ह्यातील आहेत तर लहान गटात पाट हायस्कूलची कुमारी दूर्वांगी पाटकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती.या परीक्षेमध्ये परीक्षण करताना गुगल सर्च करून लिहिलेले निबंध किंवा पुस्तकातून उतरलेले निबंध घेण्यापेक्षा स्वमताने मांडली केलेली मते यांना प्राधान्य देण्यात आले होते .राज्यस्तरावर या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. असे निबंध स्पर्धेतील आयोजकांचे मत होते सर्व यशस्वी स्पर्धकांना बालकवी समूहातर्फे डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेत, वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने चांगली बाजी मारलेली आहे या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल आयोजकांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे त्याचप्रमाणे मार्गदर्शक शिक्षकां आभार मानले या सर्व स्पर्धेमध्ये मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गांधीजींचे विचार आणि गांधीजींचे आचरण याबद्दल या निबंध मध्ये मांडणी केली होती . स्वराली साळसकर हिने या पुर्वीही निबःध स्पर्धा रांगोळी स्पर्धा ,नृत्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामधे यश संपादन केले आहे.