कणकवली /-
गोवा बनावट दारू प्रकरणी खालीक बग्गु खान (रा. उत्तरप्रदेश) व त्याचा साथीदार दीपक पुंजा पटणी (रा. कामोठे, नवी मुंबई) यांची कणकवली न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.गोव्याहून मुंबईच्या दिशेने टेम्पो मध्ये सुरू असलेली बनावट दारू वाहतूक कणकवली पोलिसांनी ओसरगाव ते कणकवली असा थरारक पाठलाग करून पकडली होती.
यात एकूण १२ लाख ९७ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पालिसांनी जप्त केला होता याबाबत टेम्पो चालक खालीक बग्गु खान व त्याचा साथीदार दीपक पुंजा पटणी यांना पोलिसांनी अटक केली होती. ही कारवाई सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. आज पुन्हा दोघांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. संशयित आरोपींतर्फे अँड. सुहेब डिंगणकर व अँड. सुहास साटम यांनी काम पाहिले.