वेंगुर्ला /-
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लाच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरावेळी रक्तदान प्रक्रियेत विशेष कार्य करणाऱ्या सिंधुदुर्ग विद्यानिकेतनचे शिक्षक नितीन कुळकर्णी व सामाजिक कार्यकर्ते सनी रेडकर यांचा सत्कार करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी ‘ए‘ निगेटीव्ह गटाच्या फ्रेश डोनरची गरज असताना नितीन कुळकर्णी यांनी सावंतवाडी येथे जाऊन रक्तदान करीत रुग्णाची असलेली रक्ताची गरज पूर्ण केली. तर सनी रेडकर यांनी आत्तापर्यंत १०४ वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा वेंगुर्लाच्यावतीने प्रसिद्ध डॉ.वामन कशाळीकर, डॉ.अंजली जोशी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, संस्थेच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या तथा नगरसेविका श्रेया मयेकर आदी उपस्थित होते.