पेंडूर गावचा दसरा उत्सव होणार साध्या पद्धतीने..

पेंडूर गावचा दसरा उत्सव होणार साध्या पद्धतीने..

कट्टा /-

मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान, पेंडूर गावचे श्रद्धास्थान असलेले ग्रामदैवत श्री देव वेताळ मंदिर येथे प्रतिवर्षी नवमीला दसरा उत्सव मोठया दिमाखात असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना महामारीचे संकट सुरु असल्याने सरकारने काही नियम लागू केले आहेत. परंतु वेताळ देवावरची श्रद्धा पाहता अनेक गावातील भाविक भक्तगण मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन करणे, गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्स ठेवणे या सरकारी नियमांवर नियंत्रण ठेवणे देवस्थान कमिटी व सेवेकरी मंडळींना शक्य होणार नाही. त्यामुळे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीचा दसरा उत्सव साजरा केला जाणार नसून यावर्षी बारा पाच मानकरी, गावकर मंडळी यांच्या उपस्थितीत गर्दी न करता साध्या पध्दतीने दसरा उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या वर्षी दसरा उत्सवाला भाविक मंडळी, तसेच मंदिर परिसरात येणारे व्यापारी यांनी गर्दी करू नये. आपली श्री देव वेताळावर नितांत श्रद्धा आहे. त्यामुळे आपण घरी राहूनच देवाच्या चरणी प्रार्थना करावी. आणि सुरक्षित रहावे. असे आवाहन देवस्थान ट्रस्ट, पेंडूर ता. मालवण यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..