कणकवली/-

कोरोनाच्या महामारीत आज संपुर्ण जग संकटात असताना काही सामाजिक, स्वयंसेवी संस्था आपआपल्या परीने सामाजिक उपक्रम राबवुन मदतकार्यात आपला खारीचा वाटा उचलुन दातृत्वाचा धर्म निभावत आहेत. यापैकी नवीन कुर्ली फोंडाघाट येथील ‘नवदुर्गा युवा मंडळ’ विविध सामाजिक उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपत आहे. आज कोरोनामुळे सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रम करत असताना काही नियम व अटीचे पालन करावे लागत असल्याने काही सांस्कृतिक कार्यक्रमावर बंधन असतानाहि रक्तदान श्रेष्ठदान समजुन नवदुर्गा युवा मंडळाने आयोजीत केलेला रक्तदान शिबीर कार्यक्रम निश्चितचं कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्वार वैद्यकीय अधिकारी शासकीय रक्तपेढी विभाग सिंधुदुर्ग डॉ. राजेश पालव यांनी जि.प.पुर्ण प्राथमिक शाळा नवीन कुर्ली येथील रक्तदान शिबीर कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी काढले.

‘नवदुर्गा युवा मंडळ’ गेली १८ वर्ष सातत्यपुर्ण सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे आयोजन करुन विविध धार्मिक, सांस्कृतिक,सामाजिक,उपक्रम राबवत आहे,तर गेली १० वर्ष रक्तदान शिबीरासारखे उपक्रम राबवुन माणुसकी जोपासत आहे. आपल्या एका रक्ताच्या बॉटलने एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचु शकतात,एखाद्या व्यक्तीला जीवदान मिळु शकतं यापेक्षा महान कार्य कोणतेचं असु शकत नाही. रक्तदान सारखा सामाजिक उपक्रम राबवणे ही प्रेरणा निर्माण होणंच आपण समाजाशी किती बांधील आहोत हे उत्तम उदाहरण दाखवण्यासारखं आहे. मंडळाने अशा प्रकारचे कार्यक्रम करत रहावे एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणुन सर्वतोपरी माझं नेहमीचं सहकार्य असेल असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य श्री. मनोज रावराणे यांनी केले.

यावेळी उपस्थित रक्तपेढी विभाग सिंधुदुर्ग अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान का करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी डॉ. राजेश पालव- वैद्यकीय अधिकारी,श्रीम. दिपाली माळगावकर- रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी,श्रीम. हेमांगी रणदिवे- अधिपरिचारिका,किशोर नांदगावकर,नितीन गावकर,उल्हास राणे,सुरेश डोंगरे आदी. अधिकारी,कर्मचारी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्री. धुमाळे जि.प.पुर्ण प्राथमिक शाळेच्या श्रीम. रेणुका जोशी मॅडम तसेच कणकवली पंचायत समिती सदस्य श्री. मनो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page