वेंगुर्लेत बोन्साय कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्लेत बोन्साय कार्यशाळा संपन्न..

वेंगुर्ला /-

कोवीड-१९ मुळे जगभर पसरलेला तणाव दूर करुन बोन्सायसारखे बहुरंगी कौशल्य आत्मसात करणारे छंद जपणाऱ्या हरित मित्रांनी भरवलेला ‘झुम मेळावा‘ सहभागींना वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला.

कोल्हापूर बोन्साय क्लबच्या पुढाकाराने व बॅ. खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला, गार्डन्स क्लब कोल्हापूर, इंडियन वूमन साईनटिस्ट असोसिएशन यांच्या सहकार्याने बोन्सायचे मुलभूत कौशल्य शिकविणारी कार्यशाळा भरवण्यात आली. केबीसी सचिव दिपाली तायवाडे-पाटील यांनी प्रदर्शनातून मामे बोन्सायची मांडणी केली होती.
केबीसी अध्यक्षा।सुनिती देशमुख यांनी पॉवर पॉईंटद्वारा बोन्सायचा इतिहास, बागा, साहित्य यांची बारकाईने माहिती दिली.

जुनिपरच्या झाडाचे ‘फॉर्मल अपराईट‘ या मूलभूत प्रकाराचे प्रात्यक्षिक दाखवले. बोन्साय कलेमधे आलेले नवनवीन बदल व जुने पूरकेर, जगभरातील तज्ञ, भारतातील बोन्साय क्लब याबद्दलची माहिती सहभागींसाठी नविन व प्रोत्साहित करणारी ठरली. भारतीय झाडे बोन्सायसाठी वैविध्यपूर्ण ठरवून त्याचे अनेक प्रकार जगासमोर आणण्याचे व हे कौशल्य शिकून जगाच्या बाजारपेठेत युवा पिढीने उतरण्याचे आव्हान स्विकारावे असे सुनिती देशमूख यांनी सांगितले.लखनौचे ज्येष्ठ बोन्साय कलाकार संतोष अरोरा यांनी आयोजकांचे कौतुक केले व या कलेचा प्रसार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून तसेच तैवानहून काही उद्यानप्रेमी यात सहभागी झाले होते. समन्वयक म्हणून डॉ. धनश्री पाटील व प्रा. विवेक चव्हाण, वेदश्री, प्रमिला, तनीष्का यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. प्रा. डॉ. व्ही.ए.देऊलकर, डॉ. निरंजना चव्हाण व कल्पना सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

अभिप्राय द्या..