खारेपाटण वासीयांनी केले उत्स्फूर्त स्वागत..
खारेपाटण /-
पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारी कुरुंदवाड खारेपाटण ही बस सेवा सुमारे ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच
२३ मार्च च्या लॉकडाऊन नंतर बंद करण्यात आली होती.त्यामुळे खारेपाटण दशक्रोशीतील सुमारे ५० गावातील लोकांना कोल्हापूर जाण्यासाठी हक्काची १ ली बस तसेच कोल्हापूर हुन येणारी शेवटची बस बंद झाल्याने ये जा करण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत होता.
मात्र आता अनलॉक प्रक्रियेत एस टी बसेस पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर कुरुंदवाड गाडी कधी सुरू होते. या कडे प्रवाशांचे लक्ष लागले होते. काल दि ३० रोजी कुरुंदवाड डेपोची बस सांय. 8 वाजता खारेपाटण स्थानकात दाखल झाली व खारेपाटण ग्रामस्थांनी व प्रवाशांनी कुरुंदवाड गाडीचे वाहक चालक याना गुलाब पुष्प देत स्वागत केले आहे.
कोल्हापूर खारेपाटण ला जोडणारा गगनबावडा घाट मार्ग बंद असल्याने या भागातील सर्वच वाहतूक गेले ७ महिने अपवाद वगळता शासनाकडून बंद करण्यात आली होती. परंतु काल पासून ही वाहतूक पुन्हा सुरु झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.