माठेवाडा परिसरातील रस्ता दुरुस्त करा .;नागरिकांची मागणी..

माठेवाडा परिसरातील रस्ता दुरुस्त करा .;नागरिकांची मागणी..

सावंतवाडी /-

उभाबाजार येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते माठेवाडा येथील भागिरथी मंदिर परिसरातील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली असून या रस्त्यांची झालेली डागडुजी ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने याचा त्रास माठेवाड्यातील नागरिकांना सोसावा लागत आहे.

या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी आज श्री देव आत्मेश्र्वर आणि श्री देव दामोदर भारती मठ स्थानिक सल्लागार उपसमिती माठेवाडा यांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी संतोष जिंरगे यांच्याकडे करण्यात आली आहे.

यावेळी पुंडलिक दळवी, बाळ चोनकर, मनोज मयेकर, पंकज आपटे, अमित सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..