नवी दिल्ली /-

▪️ कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्वात आघाडीवर असणाऱ्या डॉक्टर आणि पोलीस यांनी आपले प्राण पणाला लावत अनेक नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यात मोलाची भूमिका निभावली.

▪️कोरोनाविरुद्धच्या या लढाईत आत्तापर्यंत तब्बल ३४३ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले आहेत. अशी माहिती स्वतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिली.

▪️ गृहमंत्री अमित शहा यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त दिल्लीतील ‘राष्ट्रीय पोलीस स्मारका’वर श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते बोलत होते.

▪️ ‘आत्तापर्यंत एकूण ३५ हजार ३९८ पोलीस कर्मचारी शहीद झालेले आहेत. हे स्मारक केवळ विटा, दगड आणि सिमेंटनं बनलेलं स्मारक नाही तर हे स्मारक आपल्या वीर जवानांच्या शहिदत्वाची आठवण करून देतं.

▪️स्वातंत्र्यकाळापासून आत्तापर्यंत देशातील सर्व राज्याच्या पोलीस आणि सशस्त्रदलाच्या ज्या जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या सर्वांना मी श्रद्धांजली अर्पित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page