एन 95 मास्क झाले अधिक स्वस्त !

एन 95 मास्क झाले अधिक स्वस्त !

मुंबई /-

कोरोना महामारीच्या कालावधीत आवश्यक असणारे मास्क आता रास्त दरात उपलब्ध होणार आहेत. एन 95 मास्क सुमारे 19 ते 49 रुपयांपर्यंत तसेच दुपदरी आणि तीन पदरी मास्क तीन ते चार रुपयांना मिळणार आहे.

योग्य किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात साथरोग कायदा लागू असेपर्यंत ही अधिकतम विक्री मूल्य मर्यादा लागू राहणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटाचा फायदा घेत अनेक विक्रेत्यांनी मास्क व सॅनिटायझरची काळ्या बाजारात विक्री सुरू केली होती. मास्क अतिशय चढय़ा भावाने विकले जात होते. त्यामुळे मास्क व सॅनिटायझरच्या किंमती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती नेमली होती. त्यामुळे आजच्या तारखेपासून सरकारने ठरवून दिलेल्या दरानुसार विक्रेत्यांना मास्कची विक्री करावी लागेल.

अभिप्राय द्या..