मसुरे /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या दोन शुटींगबॉल असोसिएशनच्या प्रमुख आजी-माजी खेळाडूंची ‘खेळाडूंचे एकत्रिकरण’ हा मुख्य उद्देश ठेऊन कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे शुटिंगबॉलचे माजी खेळाडु व वेंगुर्ला नगराध्यक्ष श्री. राजन गिरप यांचे अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर राजा देसाई, प्रमोद मोहिते, एकनाथ केसरकर, सुरेंद्र सकपाळ, सुभाष तळवडेकर, अमरसेन सावंत, सलिम बोबडे, बबन गवस, शैलेश सुर्वे अशा अनेक जेष्ठ खेळाडूंसह अनेक आजी माजी खेळाडु उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे किरण शिंदे व बाबल कुडाळकर यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
प्रस्ताविक करताना दिनेश पवार यांनी राज्यस्तरीय खेळाडु श्री. योगेश गावडे याची आजी-माजी खेळाडूंना एकत्र आणण्याची संकल्पना व त्यासाठी दोन्ही असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व आजी माजी खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी गेले दोन महिन्यांपासून केलेले प्रयत्न सविस्तर सांगुन सर्वांचे प्रयत्नांना यश येऊन आजचा सुवर्णयोग जुळून आल्याचे सांगितले.
सर्व उपस्थित खेळाडूंचे वतीने नगराध्यक्ष श्री राजन गिरप यांचा श्री राजा देसाई यांचे हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राजन गिरप म्हणाले, नगराध्यक्ष असलोतरी या खेळाचा माजी खेळाडू म्हणुन मी सदैव तुमच्या सोबत असेन, जिल्ह्यात स्पर्धा वाढण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, या खेळासाठी स्पर्धा घेत असताना कुठे पैसे कमी पडल्यास मी सर्वतोपरी मदत करीन असे त्यांनी आश्वासनही दिले.
यावेळी राजा देसाई यांची महाराष्ट्र राज्य शुटिंग बॉल असोसिएशनच्या सदस्यपदी नियुक्ती झालेबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
जेष्ठ खेळाडू एकनाथ केसरकर म्हणाले, यापुढे जिल्ह्यात शुटिंग खेळ वाढविणेसाठी सर्व आजी खेळाडूंना एकत्र करून दोन तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाणी एक स्पर्धा अशा आठ तालुक्यात एकूण चार साखळी स्पर्धा दिवसा खेळवून खेळाडूंचा खेळ वाढवायचा आहे. शालेय पातळीवर शिबीर आयोजित करून मुलांना या खेळाची माहिती देऊन, खेळाची गोडी उत्पन्न करूया असेही सांगितले. इतर मान्यवरां मध्ये श्री सुभाष तळवडेकर, श्री वैभव पाताडे, श्री बबन गवस, श्री प्रमोद मोहिते, श्री राजा देसाई, श्री अमरसेन सावंत, व श्री सुरेंद्र सकपाळ यासर्वानी मार्गदर्शन करताना माजी खेळाडूंचा अनुभव व आजी खेळाडूंची शक्ती यांचा समन्वय साधुन जिल्ह्यात शुटिंगबॉल खेळ दर्जेदार करून जिल्ह्याचे नांव राज्यस्तरावर वाढवुया, शालेय विद्यार्थी यांना शालेय स्तरावर गुण मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करूया, खेळात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता खेळासाठी सक्रिय योगदान देऊया. असे सांगितले. दिनेश पवार यांनी आभार मानताना
जिल्ह्यातील दोन्ही असोशिएशनचे पदाधिकारी, सर्व आजी माजी खेळाडु, स्पर्धा आयोजक, हितचिंतक, यांची एकत्रित भव्य बैठक सर्वांचे वतीने लवकरच घेण्याचे जाहीर करून सदर बैठकीचे ठिकाण व तारीख कोरोना प्रादुर्भाव पाहुन लवकरच निश्चित करून सर्वाना कळविले जाईल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page