सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या समवेत आज कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे, पावशी, पिंगुळी आणि माणगांव येथील पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी केली. प्रशासनामार्फत सुरू असलेल्या पंचनाम्यांचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी शेतक-यांशी संवाद साधत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला.
यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जिल्हा प्रमुख संजय पडते, युवानेते संदेश पारकर, जि.प.गटनेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख राजन नाईक, सभापती सौ.नुतन आईर, उपसभापती जयभारत पालव, प्रांताधिकारी सौ.वंदना खरमाळे, जिल्हा कृषी अधिकारी श्री.म्हेत्रे, तहसीलदार अमोल पाठक, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, विकास कुडाळकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, सौ.स्नेहा दळवी, सचिन काळप, सुशील चिंदरकर, पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, वेताळबांबर्डे सरपंच सौ.संध्या मेस्त्री, पिंगुळी सरपंच निर्मला पालकर आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.