दुबई /-

आयपीएल २०२०च्या ३६व्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सनचा पराभव केला. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत सहा गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्त्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजबाचा संघ निर्धारित षटकांत ६ गडी गमावून १७६ धावाच काढू शकला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला. मात्र, तिथेही सामना टाय झाल्याने दुसरी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यात पंजाबने बाजी मारली.

आयपीएलच्या १३व्या सत्रातील ३५वा मॅचमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने सनरायजर्स हैदराबाद (SRH)ला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. केकेआरसाठी सुपर ओव्हरमध्ये फर्ग्यूसनने ३ बॉलवर डेविड वॉर्नर आणि अब्दुल समदला आउट केले. हैदराबाद सुपर ओव्हरमध्ये फक्त २ धावा काढू शकले. केकेआरने ४ बॉलमध्येच सामना आपल्या नावे केला. हैदराबादसाठी राशिद खानने सुपर ओव्हर टाकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page