हरकती नोंदवण्यासाठी २५ ऑक्टोंबर पर्यंत मुदत : तालुका समन्वय नोडल अधिकारी
दोडामार्ग /-
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा अनेक जण लाभ घेत आहेत मात्र यात अनेकजण अपात्र ठरत असून ते मात्र आज पर्यंत या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत, दरम्यान आता मात्र अशा अपात्र लाभार्थ्यावर कारवाईचे संकेत मिळत असून असे जर कोण अपात्र लाभार्थी आपल्या आजूबाजूला असतील तर शासनाला मदत म्ह्णून अशा लाभार्थ्याबद्दल हरकती असतील तर जवळील तहसील, तलाठी, ग्रामपंचायत कार्यलयात तोंडी किंवा लेखी स्वरूपात करण्याची सूचना तालुका समन्वय नोडल अधिकारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तथा तहसीलदार दोडामार्ग यांनी केली आहे.
अनेक लोकांकडे लाभाचे पद असते तसेच जमीन धारण करणारी व्यक्ती, केंद्र व राज्य शासनाचे कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक नोंदणीकृत व्यावसायिक, तसेच अनेक सनदी अधिकारी हे या योजनेचा लाभ घेवू शकत नाहीत, मात्र असे काही लोक हा लाभ घेताहेत, याबाबत माहिती असल्यास २५ ऑक्टोंबर २०२० संध्या ५:०० वाजेपर्यंत या हरकती नोंदविण्यात याव्यात असेही नायब तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.