आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे निधन..

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे निधन..

वेंगुर्ले /-

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांचे अल्पशा आजाराने मुंबई येथे राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली अनेक वर्षे ते मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते.दरम्यान आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-खासबाग येथील मूळचे असलेले श्री.नाईक हे कामानिमित्त मुंबईतच वास्तव्यास होते. त्यांच्या निधनानंतर शिरोडा वासीयांसह त्यांच्या शिष्यवर्गातून व चाहत्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. श्री. नाईक यांचे बालपण शिरोडा गावात गेले.

अभिप्राय द्या..