रत्नागिरी /-
रत्नागिरीत राज्यातील पहिले पोस्ट कोविड कौन्सिलिंग केंद्र सुरु करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोविड स्थिती समाधानकारक असल्याचे सांगत श्री. सामंत म्हणाले, जिल्हा कोविड रुग्णालयात 66 रुग्ण उपचार घेत आहे. रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिला रुग्णालय कोविड रुग्णासाठी केले जाईल. याबाबत जिल्हाधिकारी आठ दिवसात कार्यवाही करतील. जिल्हा रुग्णालय नॉन कोविड करण्यात येणार आहे. तत्पुर्वी ते सॅनिटाईज केले जाईल.
▪️रत्नागिरी नगरपालिकेने सुरु केलेल्या आरोग्य मंदिर येथील रुग्णालयात पोस्ट कोविड सेंटर सुरु केले जाईल. कोविड झाल्यानंतर रुग्णांना दिसणार्या लक्षणांवरील मार्गदर्शनासाठी हे केंद्र राहील.