ब्युरो न्यूज /-
▪️हाथरस घटनेच्या निषेधार्थ २६ ऑक्टोबरला काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी या मुद्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे
केरळने निष्काळजीपणाची किंमत मोजली : केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन; ओनम उत्सवापूर्वी केरळमध्ये रुग्णसंख्या ५४ हजार होती, आता बाधितांच्या संख्येने ३.३ लाखांचा टप्पा ओलांडला
हिवाळ्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, देशभरात निर्बंधांचे पालन आवश्यक; लस व्यवस्थापन गटाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांची स्पष्टोक्ती
राज्यात दिवसभरात ११ हजार २०४ जण कोरोनामुक्त; १५० रुग्णांचा मृत्यू; ९ हजार ६० नवे कोरोनाबाधित आढळले
आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात ‘ट्रॅव्हल बबल’ पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत सुरूच राहू शकते; नागरी उड्डयनमंत्री हरदीपसिंग पुरी यांचे प्रतिपादन
▪️ आयएनएस चेन्नईवरुन ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; नौदलाला आता दूरवर साधता येणार निशाणा; या क्षेपणास्त्राची क्षमता पूर्वीच्या रेंजपेक्षा अधिक वाढली
पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा यासह विविध मागण्यांसाठी थायलंडमधील लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांनी रविवारी सलग पाचव्या दिवशी केली जोरदार निदर्शने
चीनमध्ये निसर्गाचं अचंबित करणारं रूप; एकाच वेळी ३ सूर्य दिसल्याने जगभरात चर्चा, फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलेच व्हायरल
आयपीएल २०२० : २ सुपर ओव्हरच्या रोमांचक लढतीत किंग्ज इलेव्हन पंजाब ठरली अव्वल; मुंबई इंडियन्स पराभूत
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटातील नवे गाणे ‘बुर्ज खलीफा’ प्रदर्शित; गाण्यात कियारा आणि अक्षय रोमँटीक अंदाजात दिसत आहेत